logo

प्रशासन जोमात आणि पेशंट कोमात

मंगेश भाऊ गमे यांच्या माहितीनुसार
*कळमेश्वर मधील ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णवाहिका असून रुग्णांना नेण्याकरिता डॉक्टरांकडून मनाई*

*कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या व ॲम्बुलन्स चालक च्या मनमानीमुळे रुग्णांच्या बळी होताना दिसतोय*
आज दिनांक 30 एप्रिल 2024 मंगळवार रोजी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे इमर्जन्सी पेशंट घेऊन गेले असता तेथील महिला डॉक्टर यांनी नागपूर रेफर केले परंतु त्यांनी ॲम्बुलन्स नाही आमच्याकडे असे सांगितले व प्रायव्हेट ॲम्बुलन्स करून तुम्ही आपला पेशंट घेऊन जाऊ शकता असे बोलले परंतु कळमेश्वर गव्हर्मेंट हॉस्पिटल येथे फ्री सेवा ॲम्बुलन्स असूनही कळमेश्वर गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथील महिला डॉक्टर यांनी फ्री सेवा ॲम्बुलन्स चा अति आवश्यक गरज असलेल्या पेशंटला ॲम्बुलन्स अवेलेबल नाही असे बोलले व कळमेश्वर येथील फ्री सेवा ॲम्बुलन्स चालक हे तिथे कार्यरत असूनही त्यांची स्वतःची प्रायव्हेट ॲम्बुलन्स आहे व ते त्या ॲम्बुलन्स मध्ये पेशंट घेऊन जातात व त्यांच्याकडून पैसेही घेतात परंतु ते फ्री ॲम्बुलन्स अवेलेबल असूनही काढत नाही पगार सरकारचा पण घेतात आणि स्वतःची प्रायव्हेट ॲम्बुलन्स ही चालवतात आणि फ्री सेवा ॲम्बुलन्स उभी ठेवतात.

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

120
4715 views